StatCounter

Friday, July 26, 2013

Syllabus of the course of Case-Based Introduction to Biostatistics

ScheduleHelp

Case-Based Introduction to Biostatistics
July 22 – August 25, 2013
Module 1 (Weeks 1 & 2) Question: What common background understanding do I need to get started in improving my ability to critically and quantitatively reason about health questions?
Week 1: July 22-July 28
Question
Statistical ideas
Statistical skills
Videos
Homework
Quiz
What is the scientific method?
Experiments generate evidence that supports some competing hypotheses more than others.
Specify hypotheses
1.1. Scientific method
1A
1A
How do we quantify evidence?
Likelihood ratio updates the prior odds to obtain posterior odds
Calculate odds from a probability;
Calculate a probability from an odds.
1.1. Scientific method
1A
1A
What does it mean to say: “this drug prevents heart attacks” or “obesity increases the cost of medical care”
The meaning of “cause” can usefully be made precise in terms of potential outcomes.
Determine whether a statement is “causal” or not.
1.2. On “cause”
1A
1A
What is probability?
Probability means long-run frequency or alternately is a quantification of the strength of belief; joint, marginal, conditional probabilities
Calculate probabilities from data in a 2x2 table.
1.3. On probability
1A
1A
Week 2: July 29-August 4
Question
Statistical ideas
Statistical skills
Videos
Homework
Quiz
What is a probability distribution for a random variable?
Probability distribution is a function that takes a possible value (discrete) or set of values (continuous) as input and returns the probability the random variable assumes the input value(s).
Calculate specified probabilities from a given probability distribution.
1.4. Probability distributions.
1B
1B
What is the binomial distribution? (What is meant by “independence” of two events?)
A mathematical model for INDEPENDENT coin tossing-like systems in nature.
Given the number of tosses (n) and probability of success on each INDEPENDENT toss (p), calculate the probability of observing x out of n successes for any x between 0 and n.
1.5. Binomial distribution
1B
1B
What is the Gaussian (“normal”) distribution and how is it derived?
Mathematical model for the probability distribution of the average of independent random variables.
Approximate the probability a Gaussian random variable with specified mean and variances falls in any given interval.
1.6. Gaussian distribution
1B
1B
Module 2 (Weeks 3 & 4) Question: How do the average medical care costs for people with a major smoking-caused disease (MSCD) differ from those for people without MSCDs who are otherwise similar?
Week 3: August 5-August 11
Question
Statistical ideas
Statistical skills
Videos
Homework
Quiz
What is the probability distribution of medical expenditures for persons with/without a MSCD?
Distribution of medical expenditures; summaries of location, spread, and shape; transforming the variable to better understand the distribution.
Calculate a mean, median, quartiles, standard deviation; Make and interpret a stem and leaf plot;
Make and interpret a boxplot.
2.1. Distribution of medical expenditures
2A
2A
What is the probability distribution of an independent sample of size n drawn from the observed distribution of medical expenditures
Simple random sampling; Stratified sampling; Central limit theorem.
2.2. Sampling and the Central Limit Theorem
2A
2A
What is a confidence interval for the population mean?
Confidence intervals as interval estimates for an unknown population mean (the truth we seek).
Calculate a 95% or 99% confidence interval for an unknown population mean from a sample of n independent observations drawn from the population.
2.3. Confidence intervals.
2A
2A
Week 4: August 12-August 18
How does the distribution of medical expenditures differ for persons with vs without a MSCD?
Comparing distributions.
Differences of means;
Standardized mean differences;
Ratios.
Make and interpret a Q-Q plot.
Calculate and interpret t-statistic.
2.4. Comparing distributions
2B
2B
How does the distribution of medical expenditures differ across age and poverty strata?
Comparing distributions across several strata; table of pair-wise standardized mean differences
Interpreting multiple boxplots after variable transformation
2.4. Comparing distributions
2B
2B
How does the distribution of medical expenditures differ for persons with vs without a MSCD of similar age and poverty level?
Stratification by covariates;
Estimation within strata.
Calculate a t-statistics for each stratum; interpret results across strata
2.5. Pooling across strata
2B
2B
When is it warranted to pool results across strata and how do we do it?
“Effect modification” or “interaction”; Pooling multiple estimates, giving greater weight to the more precise estimates.
Estimate the overall effect of MSCD on medical expenditures from the stratum specific values
2.5. Pooling across strata
2B
2B
How does the pooled result compare to the simple comparison in 2.4? Why are they different?
Confounding when we fail to compare otherwise similar populations
2.6. What we learned in module 2.
2B
2B
Module 3 (Week 5) Question: What is the rate of infant survival during the first 26 weeks of life in southern Nepal and how does the rate of survival vary by infant’s gestational age, sex, or being a singleton versus twin birth?
Week 5: August 19-August 25
Question
Statistical ideas
Statistical skills
Videos
Homework
Quiz
What is an odds ratio; what is a log odds ratio; why is the log odds ratio so commonly used in health research?
Defining parameters with unbounded support; odds approximate the risk; invariance of the odds ratio
Estimate an odds ratio from a 2x2 table with 95% confidence interval
3.1. Odds ratio estimation
3A
3A
How does child survival depend upon sex and twin status?
2x2 tables; log odds “model” or “logistic regression”
Apply odds ratio estimation to answer a substantive question.
3.2. Odd ratio estimation
3A
3A
How does the log odds of child survival depend upon gestational age?
Study outcome expressed as a function of a continuous predictor variable - regression
Display the dependence of the log odds of survival on gestational age
3.3. Introduction to logistic regression
3A
3A

Sunday, March 10, 2013

पुस्तक परिचय - एका नक्षलवाद्याचा जन्म- विलास मनोहर


मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे एक अतिउत्तम दर्जाचं लिखाण केलेलं पुस्तक आहे. ही एक उत्तम कलाकृती तर आहेच पण त्या शिवाय ते वास्तवदेखील आहे. पुस्तकाच्या सुरुवातीसच लेखक हे स्पष्ट करतो की यातील घटना खऱ्या घडल्या आहेत. नावे बदलली आहेत.
इतक्या उत्तम पुस्तकाची माहिती द्यायला कुठून सुरुवात करावी हा एक प्रश्न आहे. त्याबद्दल माझ्या डोक्यात गोंधळ आहे. आणि हे पुस्तक आपल्या डोक्यातले अनेक गोंधळ तीव्र करत. माझ्यासारख्या शिकलेल्या आणि चार बुकं वाचलेल्या व्यक्तीच्या डोक्यातही  नक्षलवादाबद्दल गोंधळ आहेत. नीट माहिती नाही हे मी मान्य करायला हवं आणि मग आपण विचार करू शकतो की आदिवासी लोकांच्या मनात याबद्दल काय गोंधळ उडत असेलहा गोंधळ कायम असताना लिहिलेला हा लेख आहे.
एका नक्षलवाद्याचा जन्म’ या शीर्षकातच खूप अर्थ सामावला आहे. नक्षलवाद्याचा जन्म का होतोकसा होतोत्याला कोण कोण जबाबदार असतंया प्रश्नाची उत्तरे यात मिळतातकिंवा साहजिकच आपणच उत्तरे शोधायला लागतो.
नक्षलवादी हा कुणी आकाशातून टपकलेला प्राणी नसतो. तो पण आपल्यासारखा माणूसच असतो. पण मग तो अशी पावले का उचलतो?कुठल्याही गोष्टीचा जन्म/निर्मिती होण्यासाठी बऱ्याच घटना आणि prerequisites ची गरज असते. या सर्व prerequisitesचा अभ्यास आपल्याला यात बघायला मिळतो.
एका सत्य घटनेबरोबरच ही एक कादंबरी देखील आहे. मला साहित्यातील फार काही कळत नाही पण जेवढे कळते त्यावरून याचे साहित्यिक मूल्यही खूप उच्च दर्जाचे आहे असे वाटते. हे पुस्तक एखाद्याreport प्रमाणेही आहे. तसेच लिहिल्या गेलेल्या काळाचे ते documentationदेखील आहे. (दुर्दैवाने ते आजही लागू पडत आहे असे वाटते). हे पुस्तक एक चिंतनही आहे. या आणि अश्या प्रकारच्या समस्या कश्या सोडवाव्यात या विचारांची बीजे आपल्याला या पुस्तकात सापडतात. नक्षलवादाची समस्या सोडवण्यासाठी त्याचा जन्म समजावून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी (मुख्यतः पोलीस) जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे. हे असं होतं मग त्यानंतर असं होतं आणि मग हे असं होतं अशी गणितीय समीकरणाप्रमाणे यातील arguments ची मांडणी आहे. गोष्टी कश्या घडत जातात याबद्दल बर्णन आहे. यात गोष्टी एका मागोमाग एक आधीच्या गोष्टींच्या आधाराने घडत जातात.
लेखकाची लेखनशैली अप्रतिम आहे. लेखक कोणाचीच बाजू घेत नाही पण सर्वांच्या बाजूचे दर्शन घडवतो. कोणाचीही बाजू न घेता भावनांचे वर्णन कसे करावे याचा हे पुस्तक जणू वस्तुपाठच आहे. देहबोलीच्या निरीक्षणातील बारकावे थक्क करायला लावणारे आहेत. उदाहरणार्थ
१. - मुलाला डोक्यावरून वजन घेऊन जाताना होणारा त्रास. त्याचे ते लपवणे,पण आईच्या लक्षात येणे!
२.- जुरू (कथेचा नायक) ला पोलिसांच्या हालचालींवरून कोण वरिष्ठ पदावर आहे आणि कोण कनिष्ट पदावर आहे हे समजणे.  
३. - शाळेत जात असणाऱ्या मुलाच्या विचारातील आणि त्यामुळे होणारे देहबोलीतील बदल.
४. - चेहऱ्यावरच्या भावना लपवायला शिकलेला आदिवासी पोलीस स्टेशनवर जाऊन आल्यावर कसा त्या दाखवायला शिकतो. इत्यादी
काही लेखकांची लिखाणाची शैली इतकी उत्तम असते की त्यांच्या शब्दांमुळे आपल्या डोळ्यासमोर सहज चित्र उभे रहाते. याला word pictureअसे म्हणतात. विलास मनोहरांची लिखाणाची शैली अशी word pictureआहे. हे एक जीव ओतून लिहिलेले पुस्तक आहे.
हे पुस्तक फक्त नक्षलवाद ह्या समस्येच्या करणावर भाष्य करत नाही तर आदिवासींचे रोजचे जीवनआणि त्यांची जीवन जगण्याची पद्धत याबद्दलही माहिती देते. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आदिवासींच्या जीवनात डोकावतो. त्यांच्या परंपराश्रद्धायोग्य अयोग्यतेच्या कल्पनांबद्दल माहिती मिळते.
संपर्कात आलेल्या अनेक बिगर आदिवासींनी वर्षानुवर्षे आदिवासींचे केलेले शोषण किती तीव्र आहे हे सुस्पष्ट होते. आदिवासींना वाटणारी पोलिस आणि नक्षलवाद्यांची दुहेरी दहशत जाणवते. माझी नक्षलवादाच्या बातम्यांबद्दलची प्रतिक्रिया "अरे बापरे" अशी होती आणि आहे. पण सतत दहशतीखाली असणाऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पना केलेलीच बरी. यातील बातम्यांवरून आपल्याला कितीक आणि किती खरी माहिती मिळते याबद्दलही आपण पुस्तक वाचल्यावर विचार करायला लागतो.
पोलिसांचेफॉरेस्ट ऑफिसर्सचे वर्णनपोलीस पाटलाचे वर्णन यातून परिस्थितीची कल्पना येते आणि हा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे याची जाणीव होते. त्यामुळे नक्षलवादाबद्दल बेजबाबदारबेधडक विधाने करणे किमान मी तरी टाळेल याची मला खात्री वाटते.
आदिवासींना करावे लागणारे शारीरिक कष्टत्याकडे त्यांची बघण्याची पद्धतत्यांची तंटा सोडवण्याची पद्धतकपडेशिक्षण याबद्दलचे मत यात वर्णन केले आहे. हे सगळे शहरी लोकांपेक्षा वेगळे असणारे घटक तर यात वर्णिलेले आहेतच पण त्याच बरोबर त्यांना शहरी लोकांबरोबर जोडणाऱ्या काही धाग्यांचेही यात वर्णन आहे. हे सर्व कथेच्या पार्श्वभूमीवर घडत असते.  काही प्रसंग इतके सखोल वर्णिलेले आहेत की त्यावेळी नक्की काय घडत असेल याची बरीच कल्पना येते.
हे पुस्तक नक्षलवादाच्या जन्माबद्दल आणि कारणांबद्दल भाष्य तर करताच पण त्याचबरोबर विचारांचाभावनांचा आणि देहबोली आणि घटनांच्या निरीक्षणांचा एक खजिना आहे. ज्याची जेवढी आकलनक्षमता असेलत्याला तेवढ्या प्रमाणात हे धन मिळतं. पोलिसफोरेस्ट गार्ड आणि त्यांच्या मदतीला असलेले पोलिस पाटील यांनी जर आदिवासींचे इतके शोषण केले नसतेतर ही समस्या इतकी मोठी झाली नसतीकिवा मुळात उभीच राहिली नसती.
हे पुस्तक मला पूर्णपणे समजले आहे असे मला काही वाटत नाही. तरीपण मला जेवढ समजले आहे ते share करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
अभिजीत सफई
http://simollanghan.blogspot.in/2013/03/blog-post_8.html